प्रश्न पडला आज की कशाला IT त शिरलास,
होत्या नव्हत्या आपल्या Personal आयुष्याला विसरलास,
अचानक आठवले ते रमणीय दिवस,
अचानक आठवले ते रमणीय दिवस,
जेव्हा रात्री २.३० वाजता मित्राचा Phone यायचा,
आणि तू लगेच ती Chocolate Brownie खायला पळायचा,
तेव्हा एकदाही "का" म्हणून नाही विचारलेस,
आजकाल तिला नेहमीच "का" असे विचारतोस,
आधि..आधि रात्र झाल्यावरच गप्पा रंगायच्या,
आज रात्रीची भिती वाटते,
कारण सकाळी जर का ऊशीर झाला,
तर कामाची गर्दी दाटते,
आधि सुट्ट्या घेऊन जगावर राज्य करायचो,
आजकाल Half-Day मागावा लागतो,
आणि माझा वाढदिवस पण.......
Office च्या त्या Cake वरच भागतो,
स्वप्नांमधे राजकुमार बनून हिंडायचो,
आजकाल स्वप्न पडायचे स्वप्न बघतो,
आणि जर का गरज पडलीच,
तर Weekend ला ही कामावर निघतो
होती खूप गोष्टींची आवड,
सुटला सगळ्यांचा सहवास,
या सगळ्यांचे कारण म्हणजे,
आपल्या So called CAREER चा प्रवास........
म्हणूनच ....
प्रश्न पडला आज की कशाला IT त शिरलास,
होत्या नव्हत्या आपल्या Personal आयुष्याला विसरलास......
ekdum barobar lihlas yaar...gele te din gele :(
ReplyDelete